मोडनिंब (ता.माढा) येथील श्री वेताळ देवस्थान यात्रेच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी पार पडली. या बैठकीस टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते.बैठकीत
यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. सार्वजनिक शांतता राखण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक पवार यांनी यावेळी केले.या बैठकीत वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, आरोग्य सुविधा, आदी महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा झाली. यात्रेच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला.यावेळी माजी सरपंच कैलास तोडकरी, श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुरण गिड्डे, नागनाथ ओहोळ, प्रकाश गिड्डे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील,सदाशिव पाटोळे, उपसरपंच अमित कोळी,उपाध्यक्ष संभाजी लादे, सचिव विजय खेलबुडे, मोडनिंब प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रथमेश पवार, हनुमंत कुंभार, चंद्रकांत गिड्डे, शिवाजी गोरे, राजेश निंबाळकर, एकनाथ सुर्वे,जयवंत ओहोळ, प्रकाश डोंगरे, हनुमंत पाटोळे, संतोष पाटील, दिपक सुर्वे, राहुल पाटील, किरण खडके, ऋषिकेश कोठावळे, पृथ्वीराज पाटील, प्रमोद गाडे,बालाजी वाघमारे, ऋषिकेश पाटील, आप्पा पाटील, अतुल गाडे, अमोल पवार, रत्नदीप गुरव यासह पोलिस हवालदार आतार, पोलिस हवालदार देवकर, पोलिस हवालदार वाघमोडे, पोलिस कॉन्स्टेबल इंगोले,गोपाळ शिंदे, बापू दगडे यांच्यासह ग्रामस्थ, नागरिक,पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट