Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय एकत्रिकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन

0

पुणे : पुणे शहराला एक वेगळीच राजकीय संस्कृती आहे. सध्या पुण्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. याच उत्सवाच्या निमित्ताने पुण्यात सर्वपक्षीय एकत्रीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सण – उत्सव काळात सर्व पक्षीय नेते मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येत असतात. याच अनुषंगाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोथरुडमधील मैत्रीय व्यासपीठाच्या वतीने सर्वपक्षीय एकत्रिकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कोथरुडमधील सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. बंधूभाव कायम रहावा अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली .

Leave A Reply

Your email address will not be published.