Latest Marathi News

BREAKING NEWS

कोथरुड गणेश फेस्टिव्हलमध्ये कोथरुडचे रहिवासी असलेल्या व उत्तुंग कर्तुत्व बजावलेल्या ५ मान्यवरांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान

0

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा सादर करणारा कोथरूड गणेश फेस्टिव्हल यंदा दुसरे वर्ष साजरे करीत आहे. कोथरूड गणेश फेस्टीव्हलचे स्वागत अध्यक्ष महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूषविले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडचे रहिवासी असलेल्या व उत्तुंग कर्तुत्व बजावलेल्या 5 मान्यवरांचा सन्मान केला.

समाजातील विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या उदघाटन सोहळ्यात कोथरूड सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात प्रसिध्द तबला नवाज पं. विजय घाटे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रवीण बढेकर, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा संजय चोरडिया, उद्योजक जितेंद्र जोशी आणि चित्रपट दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड या 5 कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता.

यावेळी विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे, सुनील तटकरे, चित्राताई वाघ, रुपालीताई चाकणकर आदी उपस्थित होते. कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन आम्ही कोथरुडकर यांनी केले असून संवाद पुणे यांची निर्मिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.