पुणे |
पुणे येथे भारतीय जनता पार्टी सोलापुर जिल्हा कोअर टीमची संघटनात्मक आढावा बैठक राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी यांचे उपस्थितीत संपन्न झाली. सोलापूर मधील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनिलजी कर्जतकर, लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश प्रभारी बाळा भेगडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, सोलापुर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, खा.जयसिद्धेश्वर स्वामी, खा.रणजितसिंह निंबाळकर, आ.राम सातपुते, आ.समाधान आवताडे,आ. रणजितसिंह मोहिते पाटील, मा.मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मा.आ.प्रशांत परिचारक, प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीभाऊ पवार,राजकुमार पाटील,संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील,शशिकांत चव्हाण आदि उपस्थित होते.