पुणे |
EMC योजना २.० च्या अंतर्गत पुण्याच्या रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात ESDM इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेतंर्गत २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर ५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
२९७.११ एकर जागेवर हे क्लस्टर उभारण्यात येणार असून यासाठी ४९२.८५ कोटी रुपये एकूण खर्च केले जाणार आहेत. स्टार्ट-अपला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात राबविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव आणि राजीव चंद्रशेखर यांचे मनःपूर्वक आभार उच्च व त्यांचे शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मानले आहेत.
तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढाकार घेऊन हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी सतत दोन महिने पाठपुरावा केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला यश आले आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत दादांनी दिली.