Latest Marathi News

BREAKING NEWS

गांधी परिवारा संबंधित तीन ट्रस्टच्या चौकशीचे आदेश, राहुल गांधी म्हणाले मी घाबरणार नाही

0

नवी दिल्ली : आपल्या ट्विटरच्या माध्यमातून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने सरकारला धारेवर धरत असतात. अशातच केंद्र सरकारने गांधी परिवारा संबंधित तीन ट्रस्टच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने याला घाबरवण्यासाठी केलेली कारवाई असे सांगितले आहे.

केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशन सहित नेहरू-गांधी परिवाराशी संबंधित असणाऱ्या तीन ट्रस्टच्या चौकशीचे आदेश दिले आहेत यासाठी मंत्रालायात एक टीम तयार करण्यात आली असून, या ट्रस्टवरती अवैध सावकारी, परदेशी देणग्या अशा अनेक कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणावर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मिस्टर मोदी यांना वाटतं की सगळं जग त्यांच्यासारखच आहे. त्यांना असे वाटते की इथे प्रत्येकजण विकला जाऊ शकतो किंवा घाबरू शकतो. पण त्यांना हे समजणार नाही की, जे सत्यासाठी लढतात, त्यांना विकतही घेऊ शकत नाही आणि घाबरवूदेखील शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.