Latest Marathi News

BREAKING NEWS

ऑर्डर केला ५४ हजारांचा नवा-कोरा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले ५ रुपयांचे साबन

0

 

ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता मुंबईमध्ये घडली आहे. Amazon Great Indian Festival Sale मधून ५४००० रुपये किमतीचा OnePlus 10T 5G फोन ऑर्डर केला असता ग्राहकाला 5 रुपयांचे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येत असलेले Exo साबण मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या अशोक भंबानी यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशोक यांनी Amazon इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या पहिल्याच दिवशी शॉपिंग साइटवर नवीन OnePlus 10T 5G मोबाइल फोन ऑर्डर केला होता, ज्याची किंमत 54,999 रुपये आहे. अशोकने ऑर्डर केलेला OnePlus घरी डिलिव्हरी करण्यात आला.

नवरात्रीचा पहिला दिवस येताच, अशोक भंबानी यांनी उत्साहाने आपला नवीन स्मार्टफोन उघडण्याची तयारी केली. पण, फोनचा बॉक्स उघडताच त्यांना खूप मोठा धक्का बसला. OnePlus 10T 5G फोनच्या बॉक्समध्ये मोबाईल नव्हता. तर स्मार्टफोनऐवजी त्यात डिशवॉशिंग साबण होते. पाच रुपयांचे डिशवॉशिंग साबण दिसताच आपली फसवणूक झाल्याचे अशोकला समजले. या फसवणुकीची माहिती देताना अशोक यांनी Amazon ग्राहक सेवेवर तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.