मुंबई | भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पाच ते दहा वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. ‘पाच दहा वर्षानंतर कशाला? आताच निवृत्ती घ्या’ या शब्दात एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टोलेबाजी केली आहे.
खडसे यांनी म्हटलं आहे की, चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही. ते विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र आता पक्षातल वातावरण त्यांना आवडलं नसावं आणि अशा वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे, असे त्यांच्या मनाला वाटलं असेल, त्यामुळे राजकारणापासून वेगळं होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एसएनडीटीमध्ये आयोजित कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा सुरु आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी ५ वर्षांनी निवृत्त होण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केलं होत आता या वक्तव्याची राजकीय वर्तुळत जोरदार चर्चा सुरु झाली असून अनके प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे.