Latest Marathi News

BREAKING NEWS

चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूड मधील बौद्ध विहाराचे होणार सुशोभिकरण

0

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी कोथरूड मधील बौद्ध विहाराचे सुशोभिकरण करण्याच्या कामाचे पाटील यांच्या पुढाकाराने भूमिपूजन करण्यात आले.

कोथरूड मधील जयभवानी नगर येथील बौद्ध विहाराचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी येथील बौद्ध समाजातील अनुयायींनी पाटील यांच्याकडे केली होती‌. या मागणीच्या अनुषंगाने कोथरूड मधील बौद्ध विहाराचे सुशोभिकरण होणार असून, त्यासाठी पुढाकार घेऊन, चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. शनिवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उद्योजक समीर पाटील, स्थानिक नगरसेविका छाया मारणे, भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, रिपाइं आठवले गटाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य ॲड. मंदार जोशी, कोथरुड मंडल अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, भारत भोसले, भाजपा प्रभाग ११ चे अध्यक्ष आशुतोष वैशंपायन, भाजपा महिला मोर्चाच्या स्वातीताई मोहोळ, सौ. मायाताई पोस्ते, भीमाज्ञान प्रसारक संघाचे अध्यक्ष जितेंद्र दामोदरे, सल्लागार तात्या कसबे, विनोद बुचटे, दिपक सगर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.