Latest Marathi News

BREAKING NEWS

निर्णय मेरिटवर द्यायला हवा होता पण.., निवडणूक आयोगाच्या निकालावर सुषमा अंधारे यांचं मत

0

निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे.

खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. संजय राऊत यांच्यानंतर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. निवडणूक आयोगानं भावनिक नाही तर तथ्याच्या आधारावर निकाल द्यायला हवा होता. आम्हीही कागदपत्रं सादर केली होती.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते सर्व मेरिट वर व्हायला पाहिजे, पण त्यांनी कधी मेरिट सिद्धच केलं नाही असं अंधारे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं अंधारे यांनी? निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना अंधारे यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे, तसेच काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगानं भावनिक नाही तर तथ्याच्या आधारावर निकाल द्यायला हवा होता.

यंत्रणेचा वापर’ पुढे बोतलाना त्या म्हणाल्या की, यंत्रणाच्या बळावर भाजप मुख्यमंत्र्यांचा वापर करत आहे, आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फडणवीसांना विचारावं लागतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल कोश्यारींविरोधात देखील भूमिका घेतली नव्हती . शिंदे गटाने धनुष्यबाण भाजपकडे गहाण ठेवलं आहे असा टोला सुद्धा लगावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.