Latest Marathi News

BREAKING NEWS

वेरूळ अजिंठा महोत्सवाच्या तिकीट विक्रीचा मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ

0

औरंगाबाद |

वेरूळ अजिंठा महोत्सव २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम कलाकार सहभागी होत आहेत. आजपासून महोत्सवाच्या तिकीट विक्रीस प्रारंभ झाला. पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी जिल्हाधिकारी आणि महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते तिकीट विकत घेऊन विक्रीचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अतिरिक्त आयुक्त श्री नेमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

येत्या २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान सोनेरी महालात वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिग्गज कलाकरांना ऐकणे बघणे सर्वसामान्यांना परवडेल या दृष्टीने आयोजन समितीने तिकीट दर ठेवले असून ६००, ३०० आणि १५० रुपये असा पूर्ण सिझन (तीन दिवस)चा तिकीट दर आहे. यासाठी शहरात पाच ठिकाणी विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सेतू केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय, एमटीडीसी स्टेशन रोड, संत एकनाथ रंगमंदिर, तापडिया नाट्य मंदिर, कवड्रांगल कनॉट प्लेस या ठिकाणी हे तिकीट उपलब्ध असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.