Latest Marathi News

BREAKING NEWS

धनुष्यबाण गमावल्यानंतर कंगनाने उद्धव ठाकरे गटावर साधला निशाणा

0

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल शुक्रवारी केंद्रीय आयोगाने देऊन उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना गमवावी लागली आहे. अशातच चिन्ह आणि नाव गमावल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत हीने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेचे बाण सोडले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने कंगनाचे मुंबईतील तिचे कार्यालय तोडले होते. या कार्यालयाच्या काही भागाचे अनाधिकृत बांधकाम असल्याचे सांगत महापालिकेने प्रशासनाने त्यावर हातोडा चालवला होता. त्यानंतर कंगनाने उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. यानंतर आज पुन्हा कंगनाने ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला नसला तरी कंगणाने एकूणच शिवसेना गमावल्यानंतर प्रतिक्रिया दिली असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी कंगनाने ट्विट करत म्हणाली, “वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही,” असे टि्वट कंगनाने केले आहे. यापूर्वी सुद्धा कंगनाने अनेक ट्विट करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.