माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवले नाही, त्यांची पूजा कशाला करायची?’ असे विधान आमदार छगन भुजबळांनी केले होते.
आता भुजबळांच्या या विधानावर आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. यातच भाजप नेते नितेश राणेंनी भुजबळांवर नाव न घेता टीका केली आहे. माँ सरस्वतीचा द्वेष करणाऱ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. आता देवी सरस्वतीही यांना वाचवू शकणार नाही, असा इशारा राणेंनी दिलाय.
राणे यांनी ट्विट केले आहे की,’चेंबुरमधील बिझनेसमनला देवी सरस्वतीचा द्वेष करणाऱ्याने धमकी दिली. एफआयआर दाखल करण्यात आलंय. आता तर देवी सरस्वतीही वाचवू शकत नाही. हे हिंदुत्वाचं सरकार आहे, लक्षात ठेवा..’ असेही राणे यांनी म्हटले आहे.