Latest Marathi News

BREAKING NEWS

आकडेवारीवर बोलत नसतो, दसरा मेळाव्यालाच तुफान गर्दी बघा – दादा भुसे

0

 

सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटाने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी केली असून उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथे तर शिंदे गटाचा BKC येथे मेळावा पार पडणार आहे अशातच या दोन्ही गटाने जोरदार तयारी केली असून दसरा मेळाव्याला अलोट गर्दी होणार असून आकडेवारीवर आपण बोलत नसतो, फिल्डवर, ग्राउंडवर शिवसैनिकांसह लोकांची गर्दी दिसेल, रिझल्ट्स दिसेल अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे पालकमंत्री झाल्यानंतर नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी दसरा मेळाव्याच्या तयारी संदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, दसरा मेळाव्याची तयारी यापूर्वीच केली असून याबाबतची बैठक पार पडली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तालुक्याचे नियोजन झाले. अतिशय उस्फुर्त प्रतिसाद जनतेचा मिकणार यात शंका नाही. शिवाय हा दसरा मेळावा न भूतो न भविष्यती होणार असल्याचे भुसे म्हणाले.

मंत्री भुसे यांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना वाहतूक कोंडी अडकून ठेवण्याची तक्रार काही लोकप्रतिनिधी केलेली आहे. तुमच्याकडून कुठेतरी वाहतूक कोंडी होईल किंवा त्यांच्या मार्गामध्ये अडथळे येतील अशी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. यावर भुसे म्हणाले, एवढ्या खालच्या पातळीवर जाणारे कार्यकर्ते, शिवसैनिक नाहीत. शिवसेनाप्रमुखांची अशी शिकवण नसल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.