Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादीचे ‘हे ’ स्टार खासदार होम क्वारंटाईन

0

पुणे: जगभरासह भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २ लाख १७ हजारांच्यावर पोहचली आहे. राज्यातील अनेक नेत्यांना देखील कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. मतदारसंघात दौऱ्यावर असताना कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नेत्यांच्या संपर्कात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आता होम क्वारंटाईन झाले आहेत.

एक जून ते चार जून दरम्यान डॉ. कोल्हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते, या दरम्यानच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले. ही बातमी समजल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी तत्काळ स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भाजपचे विद्यमान आमदार आमदार महेश लांडगे,दौंडचे आमदार राहुल कुल, कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक,हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाला आहे. लांडगे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर कुल आणि टिळक यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल मंगळवारी आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.