Latest Marathi News

BREAKING NEWS

नाशकात ५०० मुली लव्ह जिहादच्या शिकार; सुरेश चव्हाण यांचा खळबळजनक दावा

0

राज्यात लव्ह जिहाद प्रकरण चांगलेच तापलेले असताना आता नाशिकमध्ये लव्ह जिहादला जोर आला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात 500 मुली लव्ह जिहादच्या शिकार झाल्या आहेत. लव्ह जिहादप्रमाणेच नाशकात लॅण्ड जिहाददेखील फोफावला असून, सुमारे 500 जागांचे क्षेत्रफळ जिहादींनी गिळंकृत केले आहे असा आरोप सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी लगावला आहे

याच नाशिकमधून सीतेला रावणाने पळवून नेल्यानंतर आपण लंकेपर्यंत जाऊन रावणाला मारले. आपल्या आजबाजूलाही रावण पसरले आहेत. त्यांना शोधून काढायचे आहे. त्यामुळे माता-भगिनींच्या रक्षणासाठी हिंदुनो, एकत्र या अशी गर्जना सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी केली. हिंदू सकल समाजतर्फे शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारी (दि.२२) सकल हिंदू समाजतर्फे हिंदू हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चव्हाणके बोलत होते.

तसेच व्यासपीठावर आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी हरीगिरी महाराज, महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे, राष्ट्रसंत अनंत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्री श्री १००८ महामंडलेश्वर रघुनाथ बाबा (फरशीवाले), जगदगुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवीतकर, स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे उपस्थित होते.

सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले की, भारतीयांना सशस्त्र क्रांतीची हाक देणारे वीर सावरकर याच पुण्यभूमीत जन्मले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्याची शपथ सावरकरांनी याच नाशिकमध्ये घेतली. महाराष्ट्रावर दिीची आक्रमणे झाली ती गुजरातमार्गे नाशिकमधूनच. मुघल आक्रमणांना सर्वप्रथम रोखले ते नाशिककरांनीच. अद्याप ही आक्रमणे सुरुच असून, आज पाडव्याच्या दिवशी पूर्वजांना स्मरण करुन माता-भगिनींची इभ्रत वाचविण्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

Leave A Reply

Your email address will not be published.