मुंबई |
पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी आहे अशी प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दरम्यान कार्यक्रम केले आहे. लोकमान्य सेवा संघांने आपली मराठमोळी संस्कृती, संस्कार, धर्म यांची जपणूक केली आहे. संस्कृती, संस्कार विसरता कामा नये.
यावेळी पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार पराग आळवणी, माजी मंत्री विनोद तावडे, डॉ. दीपक सावंत, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, डॉ. रश्मी फडणवीस यांच्यासह पार्लेकर उपस्थित होते. लोकमान्य सेवा संघाने १०० वर्षे अविरतपणे शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केले. लोकमान्यांच्या नावाने बाणेदारपणे संघ चालतोय हे कौतुकास्पद आहे. संघाने पुढच्या १०० वर्षांची तयारी करावी.
प्रत्येकांनी इतिहासाच्या संस्कृतीचा अभिमान बाळगून वाईटाचा त्याग करायला हवा. स्फूर्तीयात्रा, शोभायात्रा यातून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न होतो. आपण मराठी नववर्ष आनंदाने साजरे करतो, ३१ डिसेंबर पण साजरे करा, मात्र संस्कृती जपून करण्याचे आवाहन त्यांनी केले