महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपाचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपाची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असा संताप शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीवरून काल प्रतिक्रिया आली होती. एकनाथ शिंदेगटाला समर्थन देणाऱ्या आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणेही कठीण होईल, असा इशारा काल नारायण राणे यांनी माध्यमांसमोर दिला होता. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. आता शिवसेनेतूनही यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
संजय राऊत यांनी ट्विट करत नारायण राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नारायण राणेंची भाषा अस्वीकारार्ह आहे. शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रात आणि देशात त्यांचे योगदान सर्वश्रृत आहे. एकीकडे शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत 37हून अधिक आमदार आहेत, असा दावा केला जात आहे.
महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही .रस्त्यात अडवू.अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाहीं@PMOIndia pic.twitter.com/YU1Pc39vCb
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 24, 2022