Latest Marathi News

BREAKING NEWS

फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं ?

0

 

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार खरंच कोसळतं का हे येणाऱ्या काळात समोर येईलच. पण राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची पूर्ण शक्यता आहे आणि नव्या सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रमदेखील ठरल्याची चर्चा सुरु आहे.

 

अशातच नवं सरकार हे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार असल्याचा दावा केला जातोय. या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या रविवारी किंवा सोमवारी आयोजित केला जावू शकतो. सर्वात आधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या मंत्रिमंडळासाठी शिंदे गटाने 10 नावं दिली आहेत. यामध्ये 5 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदासाठी नावे दिली आहेत. तसेच 2 अतिरिक्त कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदावर चर्चा सुरु आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटातून कॅबिनेट मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदे, दादा भुसे, दिपक केसरकर, संजय राठोड, तानाती सावंत, बच्चू कडू आणि आशिष जैस्वाल यांची नावे सूचवण्यात आली आहेत. तर राज्यमंत्रिपदासाठी अनिल बाबर, राजेंद्र यड्रावरकर, भरत गोगावले, सदा सरवणकर, चंद्रकांत पाटील यांची नावे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. संबंधित माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे.

 

या माहितीबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. याशिवाय भाजपही अद्याप समोर आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.