बंदी स्टारकास्ट असलेला ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच रिस्पॉन्स मिळतो आहे. प्रेक्षक ‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांची मुख्य भूमिका असून पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांनी आकाशला आपल्या चिरत्रपटात स्थान दिले आहे.
सगळेच कलाकार खास भूमिकेत असून यात विशेष लक्ष वेधून घेत आहेत, ते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे ॲक्शन सीन्स. त्यांचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून याबाबतच्या सकारात्मक प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेइंडस्ट्रीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक झाले आहे. एक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे किती प्रतिभावान आहेत, हे आपल्याला माहितच आहे. यापूर्वी आपण त्यांचा अभिनयही पाहिला आहे. मात्र ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये ते पडद्यामागे काम करण्याबरोबरच पडद्यावरही काम करणार आहेत.