Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी, ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात

0

राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विविध भागात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर या सर्व परिसरामध्ये पाऊस सुरु आहे. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण परिसरात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ऐन उन्हाळ्यात छत्री घेण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी पडलेल्या स्वाखाली पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता या नुकसानीचा पंचनामा होण्यापूर्वी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.