Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊत म्हणतात, लवकरच स्फोट होणार, मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप

0

मुंबई । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे बार्शीचं ट्विट करून अडचणीत आले आहेत. यातच आता त्यांनी मालेगावातील मंत्री दादा भुसेंवरही पुढचा निशाणा साधला आहे. सोमवारी रात्री त्यांनी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसे यांच्यावर करण्यात आला आहे.

कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेत. मात्र प्रत्यक्ष कंपनीच्या वेबसाइटवर कमी शेअर्स दाखवण्यात आले आहेत. ही थेट जनतेची लूट आहे, अशा शब्दात राऊत यांनी दादा भुसे यांना इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या गिरणा अॅग्रो कंपनीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय.

राऊत यांनी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल… विशेष म्हणजे इन्फोर्समेंट डायक्टरेट अर्थात ईडी आणि देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी टॅग केलंय. त्यामुळे हा स्पष्टपणे फडणवीस यांना दिलेला इशारा समजला जातोय.

संजय राऊत यांच्या ट्विटनंतर दादा भुसे यांच्यासंदर्भातील गिरणा अॅग्रो कंपनीवरून जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांना दादा भुसे यांच्यावर उघड टीका करायला सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.