Latest Marathi News

BREAKING NEWS

नागपुरातील सभेनंतर अवघ्या काही तासात संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरेंचे फाडले पोस्टर

0

नागपूर | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या कलंक या टिकेनंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरे यांचे विमानतळावरील पोस्टर फाडले. तसेच राज्यभरात उद्धव ठाकर विरोधात भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उटीरून आंदोलन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहेत, असे म्हणाले होते. त्याला तास उलटत नाही तोच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडले. अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचा काहीही अधिकार नाही, असा एल्गार यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केला.

नेमकं प्रकरण काय आहे ?

उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये एक सभा घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस हे एकवेळ भारतीय जनता पार्टी सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं म्हणत आहेत. ही क्लिप ऐकवल्यानंतर “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” असे शब्द देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरला होता. या विधानानंतर संपूर्ण राज्यभरात भाजपा नेते उद्धव ठाकरे विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.