Latest Marathi News

BREAKING NEWS

पार्थ साळुंखेची सुवर्णपदकाला गवसणी; चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विटरद्वारे दिल्या शुभेच्छा

0

पुणे |

आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय युवा तिरंदाजी स्पर्धेत’ पार्थ साळुंखेने कोरियाचा तिरंदाज सॉग इन जून याला ७-३ गुणांनी पराभूत करत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारा पहिला आर्चर ठरला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पार्थ साळुंखेला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

पार्थ साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळवलेल्या युवा जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. आर्चरी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या श्रेणीत सुवर्णपदक मिळवणारा पार्थ साळुंखे हा पहिला भारतीय पुरुष आर्चर ठरला आहे, भारताने युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियन मध्ये आत्तापर्यंत ११ सुवर्ण पदके पटकावली आहेत. वर्ल्ड चॅम्पियन मधील ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पार्थ साळुंखे हा सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.