‘ईडी’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. सरकार त्यांना ज्यांच्या अंगावर जा म्हणतेय त्यांच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीरपणे जात आहेत हे न्यायालयाने बुधवारी संजय राऊत यांच्याबाबतीत दिलेल्या निकालाने जगजाहीर झाले आहे.सुपारी घेऊन दरोडेखोराप्रमाणे या यंत्रणा काम करत असतील तर त्या केंद्राच्या यंत्रणा होऊच शकत नाहीत. त्यामुळे अशा यंत्रणा बंद का होऊ नयेत, असा प्रश्न देशातील जनतेने विचारला पाहिजे,’ असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तमाम शिवसैनिकांसाठी आनंदाचा असा हा क्षण होता. सौ. रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांचे औक्षण करून स्वागत केले तर उद्धव ठाकरे यांनी राऊत यांची गळाभेट घेतली आणि खांद्यावर हात ठेवत दोन्ही नेते माध्यमांसमोर आले.
यावेळी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आनंदालाही पारावार नव्हता. त्यांनीही राऊत यांना मिठी मारत आपला आनंद व्यक्त केला. या अविस्मरणीय अशा भेटीचे खास पह्टो ट्विट करीत ‘हिम्मत, जिद्द, सत्य… नेहमीच जिंकणार!’, असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांच्या सुटकेबाबत आपल्या भावना व्यक्त करतानाच तपास यंत्रणांना आपल्या इशाऱयावर नाचवणाऱया भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर तुफानी हल्ला चढवला.
न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल न्यायदेवतेचे आभार मानतानाच ते म्हणाले की, ‘आजपर्यंत केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून अनेक पक्ष पह्डले गेले, अनेक पक्ष पह्डण्याचा प्रयत्न केला जात आहे, बेकायदेशीर अटका केल्या जात आहेत, खोटय़ा केसेस केल्या जात आहेत. न्यायालय हे सर्वसामान्यांच्या आशेचा किरण असते आणि न्यायालयेच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल तर देशातील तमाम जनतेने त्याचा विरोध केला पाहिजे.