Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबईतल आलात तुम्हाला आम्ही सामावून घेतलं पण..

0

मुंबई । राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध पेटलेले दिसून येत आहे. अशातच दोन दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हटवले जाऊ लागले आहेत. ज्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

तुम्ही माता मागताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत आशीर्वाद मागता याची लाज वाटत नाही का? असा सवाल केला आहे. तर आता कोणत्याही निवडणूका असू द्या या भाजपला पहिले बाहेर काढा अशी साद पुन्हा एकदा जनतेला घातली आहे. तर भाजपला खडेबोल सुनावताना सावंत यांनी टोला देखील लगावला आहे. सावंत यांनी, मुंबईतील आलात तुम्हाला सामावून घेतलं. पण, आमच्या डोक्यावर बसून तुम्हाला मिऱ्या वाटू देणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.

यावेळी मुंबईत उद्धव ठाकरे गटाच्या एका कार्यक्रमात बोलताना सावंत म्हणाले की, आम्ही सर्वांना मुंबईत सामावून घेतलं आहे पण तुम्हांला सामावून घेतल्यानंतर आमच्या डोक्यावर मिऱ्या घासू नका, आमच्या छाताडावर बसू नका कसे म्हणत नाव न घेता थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. आता या टिकला भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे गटात इनकमिंग सुरु हा बडा नेता शिवबंधन बांधणार !

Leave A Reply

Your email address will not be published.