अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो सिद्धार्थ आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर चांदेकर सतत सोशल मीडियावर काहींना काही फोटो अपलोड करत असतात मात्र आता मितालीने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोने आणि त्याखाली दिलेल्या कॅशनने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सिद्धार्थ यांच्या परिवारामध्ये नव्या व्यक्तीचा समावेश झाला आहे.
सोशल मीडियावरूनच खुद्द सिद्धार्थनं या व्यक्तीची ओळख करून दिली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्याच्या आईचं म्हणजेच सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न. आयुष्याच्या वळणावर अनेकदा आपल्याला जोडीदाराचं महत्त्वं कळतं कारण, त्यांचं असणंच आपल्याला आधार देऊन जातं. आईसाठीही ही जाणीव महत्वाची असल्याचं म्हणत सिद्धार्थनं तिला आधार देत एका नव्या प्रवासाच्या शुभेच्छाही दिल्या. आईच्या लग्नातील फोटो शेअर करत त्यानं यावर एक कॅप्शनही दिलं.
कॅप्शनमध्ये सिद्धार्थनं लिहिलंय…
‘Happy Second Innings आई!
तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं!
I love you आई!’