लोकभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे अशातच आता पुन्हा एकदा मुंबईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याकरिता प्लान सुरू आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विशेष संसद अधिवेशनात देशाचे तुकडे होणार, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.
केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने स्पष्ट केलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर नाना पटोले यांनी केला आहे.
केंद्राने कोरोना संकटावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही, नोटबंदीच्यावेळी विशेष अधिवेशन बोलावले नाही, मणिपूरच्या मुद्यावरही विशेष अधिवेशन बोलावले नाही. पण आपल्या लहरी व मनमानीपणाने आता विशेष अधिवेशन बोलावले आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची, देशाची शान आहे आणि हेच भाजपाला खुपत असल्याने मुंबईतील सर्व शक्तीस्थाने गुजरातला घेऊन जायचा मोदी सरकारचा प्लान आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं.
मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सदा सरवणकर विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंना इतिहास माहिती नाहीये बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्यांचा महाराष्ट्रात…..