Latest Marathi News

BREAKING NEWS

अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना शपथविधीचा सोहळा पार पडला हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण

0

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बुलढाणा येथे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांवर अंत्यसंस्कार होत असताना शपथ विधीचा कर्यक्रम राजभवनात पार पडत होता याच घटनेवरून थेट राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना राजभवनावर शपथविधीचा सोहळा पार पडला हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मृतांच्या यादीत बारामतीमधले तीन लोक होते.विदर्भातील लोकांची प्रेतं पडलेली होती. पण २४ तास या दुर्घटनेला व्हायच्या आधीच एकीकडे प्रेतं जळत असताना, राजभवनात हे लोक पेढे वाटत होते, फटाके वाजवत होते, शपथा घेत होते. महाराष्ट्राने इतकं निर्घृण राजकारण या आधी कधीही पाहिलेलं नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या शपथविधी सोहळ्यावर भाष्य केलं.

“या लोकांना शपथविधीची घाई होती, पण त्यांनी थोडं थांबायला हवं होतं. शपथविधीची इतकी धावपळ का केली. काल राज्याने जे चित्र पाहिलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं चित्र होतं. महाराष्ट्रावर संकट कोसळलं, २५-२६ जणांचा मृत्यू झाला, सामुदायिक अंत्यसंस्कार सुरू होते, त्याच वेळी या लोकांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची घाई लागली होती. हा काय प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. भाजपा महाराष्ट्राला कलंक लावत आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व आणि नाव पुसण्याचा खेळ सुरू आहे, या लोकशाहीला न परवडणारा खेळ आहे,” अशी टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.