Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर धैर्यशील माने यांचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता

0

महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगावमध्ये महामेळावा होतोय. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने यांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. धैर्यशील माने यांनी आपण बेळगावला जाणार असल्याचं सांगितलंही होतं. मात्र आता त्यांचा हा बेळगाव दौरा अखेर रद्द होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काल रात्री उशिरा झालेल्या चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

मी बेळगावला येत असल्याचं कर्नाटक सरकारला कळवलं आहे.मराठी माणसाच्या हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने लढाई जिवंत ठेवलं. मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी जाणार आहे. मी येत असल्याचं कर्नाटक सरकारला कळवलं आहे, असं धैर्यशील माने यांनी सांगितलं आहे. त्यानंतर धैर्यशील माने यांना कानडी भाषेत पत्र आलं. त्यातून त्यांना प्रवेश नाकारल्याचं सांगण्यात आलं.

“कर्नाटक सरकारला पत्र दिलं होतं. मराठी आणि हिंदी भाषेतून पत्र दिले. पण हिंदी भाषेतून उत्तर देता येत नाही, असं कर्नाटक सरकारचं उत्तर होतं. आज मला आलेलं पत्र कर्नाटकी भाषेतील आहे. मराठी माणसाला नेमका काय त्रास होतो याचा अनुभव आला. मी लोकशाही मार्गाने मागणी केली. कर्नाटक सरकारकडून आढंमुठी भूमिका घेतली जाते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करायला पासपोर्ट घ्यावे लागणार आहेत का? कर्नाटक प्रशासनाची भूमिका आम्हाला चक्रवून टाकणारी आहे”, अशी प्रतिक्रिया धैर्यशील माने यांनी कर्नाटक सरकारने प्रवेश नाकारल्यावर दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.