राज्यात 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आता मतमोजणीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचा झेंडा फडकेल असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात 18 डिसेंबरला 279 ग्रामपंचायतीच्या निवडणुका मतदान प्रक्रिया पार पडली.
या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्ष आम्हीच वरचढ राहू असे दावे करीत असताना उद्धव ठाकर गटातून शिंदे गटात गेलेल्या प्रतापराव जाधव यांनी खळबळजनक दावा करून विरोधकांची झोप उडवून दिली आहे. ‘278 पैकी 200 च्या वर ग्रामपंचायतीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचा विजय होणार असून आमचाच झेंडा फडकणार असल्याचं निकाला आधी जाहीर केलं आहे.
या खळबळजनक दाव्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कुठल्या आधारावर खासदार जाधव यांनी डावा केला असावा याबाबत तर्कवितर्क वाढविले जात आहेत. बुलडाणा जिल्ह्यात एकूण मतदान 80.47 टक्के मतदान झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तालुका निहाय मतदानबुलढाणा 67.43चिखली 79.78देऊळगाव राजा 83.78सिंदखेडराजा 83.37मेहकर 84. 41लोणार 82.39खामगाव 82.23शेगाव 84.55जळगाव जामोद 79.94संग्रामपूर 76.13नांदुरा 80.90मोताळा 76 .06मलकापूर 77.75