Latest Marathi News

BREAKING NEWS

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर धडकणार सहा मोर्चे

0

नागपूर | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर समाज युवा मल्हार सेना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना आदी सहा मोर्चे विधानभवनावर धडकणार आहे. अधिवेशन काळात आतापर्यंत एकूण ६३ संघटनांना मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात यादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत ४१ मोर्चे विधान भवनावर धडकणार आहेत. आजच्या मोर्चात धनगर समाज युवा मल्हार सेना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी (युनियन), शहर विकास मंच, लोकाधिकार परिषद, लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया) एनजीओ यांचा समावेश आहे. सर्वच मोर्चे यशवंत स्टेडियम येथून निघणार असून मॉरिस कॉलेज चौक, टेकडी रोडवर थांबतील. अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पुनर्बांधणीच्या मागणीसाठी पहिल्या आठवड्यात चार मोर्चे धडकणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर अंबाझरी बचाव कृती समितीतर्फे २० डिसेंबर तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी तर्फे २३ डिसेंबर रोजी मोर्चा निघेल. यासोबतच पहिल्याच दिवशी १९ डिसेंबर रोजी शहर विकास मंचातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांचे संरक्षण, विकास व संवर्धन करण्यात यावे आदींसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे दरवर्षी हिवाळी अधिवेशनात निघणाऱ्या मोर्चामध्ये दिव्यांग बांधवांची संघटना, आशा गट प्रवर्तक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.