राज्यात अवकाळी पावसानंहौदोस माजवला असून बळीराजा संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळ औध्या दौऱ्यावरून थेट नाशिकला पोहचले होते आता त्या पाटोपाठ आज आज अहमदनगर आणि धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्री आज पाहणी करणार आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी 10 वाजता पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी करतील. मुख्यमंत्री दुपारी दोन वाजता धाराशीव जिल्ह्यातील धारुर आणि दुपारी तीन वाजता वाडीबामणी या गावात नुकसानाची पाहणी करणार आहेत. काल नाशिक जिल्ह्याच्या सूर्यावर असताना त्यांनी बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपीटीमुळं बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना दिल्या आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. यामध्ये द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.