Latest Marathi News

BREAKING NEWS

बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

0

एकीकडे राम मंदिर निर्माणाचे काम युद्ध पातळीवर सुरु असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पडण्याच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला डिवचले आहे. बाबरी मशीद पाडण्यात विश्व हिंदू परिषद, कार सेवक, बजरंग दल आणि दुर्गावाहिनीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेही असतील; पण बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नाही, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले की फ्लेक्स लावले, फटाके फोडले तर मी कार्यक्रमाला येणार नाही, असे सांगतो. तरीही कार्यकर्ते फ्लेक्स लावतात. महापालिकेने असे अनधिकृत फ्लेक्स माझा फोटो असला तरी काढून तो जाळून टाकावा. फ्लेक्स काढणे, पदपथावरील अतिक्रमण काढणे ही क्षेत्रीय कार्यालयांची प्रमुख जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी अधिकृत ठिकाणीच फ्लेक्स लावावेत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, परिमंडळाचे उपायुक्तांच्या बैठकीत ते बाेलत हाेते.

शहरातील टेकड्यांवर अतिक्रमण, खोदकाम सुरू असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, टेकड्यांची सुरक्षा करणे ही महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आमच्या पक्षाचा नेता, आमदार, मंत्री असला तरीही त्याचे अतिक्रमण पाडले पाहिजे. टेकड्यांवर अतिक्रमण झाले असेल तर अधिकाऱ्यांनी मदत मागवून घेऊन कारवाई करावे, असे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.