सातारा | मंत्री गिरीश महाजनांसह शिंदे गटातील तीन मंत्र्यांनी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. पण सरकारची चर्चा अपयशी ठरली. परंतु सरकार जोपर्यंत आरक्षणाचा जीआर काढत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असे सांगून जरांगे पाटील यांनी त्यांना आणखी चार दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच राहील, असे स्पष्ट केले.
यावर मराठा आरक्षणाच्या विलंबनाला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे खासदार उदयनराजे यांनी सोलापुरात केला. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही,’ असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केला. पवारांच्या उदयनराजे भोसलेंच्या या आरपोयांमुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शकयता वर्तवली जात आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सवाल उपस्थित केला. शरद पवार हे देखील मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडून हा प्रश्न का हाताळला गेला नाही? आज आमच्या काळात हा प्रश्न उपस्थित केला जातो. पण त्यांनी हा प्रश्न का हाताळला नाही? शरद पवार हे आम्हाला ज्येष्ठ आहेत, वडील आहेत. मी पवारांवर आरोप करत नाही. पण मी मागास कुटुंबातला असतो तर मी विचारणारच की तुम्ही का केले नाही? असा सवाल त्यांनी केला.
“हे बारश्याचं की लग्नाचं निमंत्रण”; संसदेच्या विशेष अधिवेशनावर राऊतांची सडकून टीका
किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी, खाजगी वृत्तवाहिनीवर गुन्हा दाखल