केंद्र सरकारने पाच दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे या अधिवेशनावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे केंद्र सरकारनं बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की. हे नेमकं अधिवेशन बारश्याचं की लग्नाचं निमंत्रण आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, सरकारनं अचानक विशेष अधिवेशन का बोलावलं आहे? फक्त अनन्यसाधारण परिस्थितीतच अधिवेशन बोलावलं जातं. हे निमंत्रण बारश्याचं आहे का? लग्नाचं आहे का? मोदींच्या वाढदिवस साजरा केला जातोय? की भाजपचा निरोप समारंभ आहे? या अधिवेशनाचा नक्की अजेंडा काय आहे. हे काय सुरू आहे देशात?
सध्या देशात मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, बेरोजगारी आहे, चीन देशात घुसलेला आहे, असे अनेक प्रश्न आहेत. सोनिया गांधी केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहेत. महाराष्ट्रात मराठा, धनगर आरक्षणाचा, दुष्काळाचा प्रश्न पेटलेला आहे. तसेच देशाचं इंडिया नाव रद्द करण्यात येऊन केवळ भारत हेच नाव ठेवण्याची चर्चा सुरु आहे. हा एक फ्रॉड आहे. आम्ही इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून सरकारला भीती वाटत आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.
किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी, खाजगी वृत्तवाहिनीवर गुन्हा दाखल
मोठी बातमी । मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली; डॉक्टरांचं एक पथक उपोषणस्थळी दाखल