भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यावरून किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती आता या प्रकरणी आता पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आता गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी लोकशाही वृत्त वाहिनी आणि अनिल थत्ते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ई) आणि ६७ (अ) अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी याबाबत कारवाईची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात व्हायरल व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होता याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता या व्हिडिओची चौकशी करण्यास सुरवात केली आहे.
मोठी बातमी । मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली; डॉक्टरांचं एक पथक उपोषणस्थळी दाखल
किरीट सोमय्या यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी राज्यचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि सखोल चौकशी करावी, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं.