शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल असणारे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरत येथील हॉटेलवर असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्याणानंतर महाविकास आघाडी टिकणार की कोसळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलंय.

अशातच आता महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासहित अनेक नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांनी ही आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यात शरद पवारांना यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट होईल. शरद पवारांची सकाळच्या सगळ्या अपॉईटमेंट रद्द केल्या आहेत. शरद पवार कालपासून दिल्लीत मुक्कामी आहेत. दुपारी अडीच वाजता त्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला संजय राऊतही हजर राहणार होते. मात्र त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे.