Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

0

 

विधानपरिषदमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा झेंडा रोवल्यानंतर विधानपरिषद निकाल म्हणजे महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पहायला मिळेल, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. राज्यसभेनंतर विधानपरिषदेतही भाजपचे 5 आमदार विजयी ठरल्याने जल्लोष करण्यात आला.

नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे भारताचा विकास करत आहेत. महाराष्ट्र त्यांचा पाठीशी उभा आहे. महाविकास सरकारमध्ये असणारा असंतोष या निवडणुकीत पहायला मिळाला. त्यांच्यात समन्वय नसल्याने आमच्या पाचव्या आमदाराला एकही मत नसताना आम्ही विजयी झालो. ज्यांनी आम्हाला मतं दिली मी त्या सर्व आमदारांचे आणि अपक्षांचे आभार मानतो. या विजयाचं श्रेयही फडणवीसांनी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना दिलं.

एकही मत नसताना विजयी कसे झाला काय चमत्कार केला असं विचारलं असता चमत्कार वैगेरे काही नसून महाविकास आघाडीमध्ये एकी नसल्याने हे शक्य झाले. आमचा हा संघर्ष लोकाभिमुख सरकार आणल्यावरच थांबेल. आमचा हा संघर्ष सत्तेसाठी नव्हे तर जनतेसाठी, असं देवेंद्र फडणवीस माध्यामांशी बोलताना म्हणाले. विधानपरिषदेत प्रवीण दरेकर-29, राम शिंदे-30, प्रसाद लाड-28, उमा खापरे-27,श्रीकांत भारतीय-30 इतकी मते मिळवून महाविकास आघाडीला भाजपने पराभूत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.