विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना विजयी झाली असला तरी आता नवीन संकट उभे ठाकले आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये पोहोचले आहे. मात्र एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 11 आमदारसोबत असल्यामुळे शिवसेनेची चिंता अधिक वाढली आहे. अशातच धक्कादायक म्हणजे, विधान परिषदेत मतदान सुरू असताना शिंदेंचं प्लॅनिंग केलं होतं. शिंदेंकडूनच आमदारांना फोन गेला होता.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला असला तरी आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेमध्ये रात्रभर जोरबैठका सुरू होत्या. त्यानंतर अचानक एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समोर आले. त्यानंतर एकनाथ शिंदे थेट गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 शिवसेनेचे आमदार आहे.
धक्कादायक म्हणजे, विधान परिषदेत मतदान सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांची जुळवाजुळव सुरू केली होती. सर्व आमदारांना शिंदेंनी फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.
गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे. सांघवी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचंही समोर आलं आहे.