Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी | ‘इसिस’मध्ये तरुणांची भरती करणाऱ्या डॉक्टरास NIA कडून अटक

0

पुणे | सांस्कृतिक पुणे शहर आता दहशतवादी संघटनेच केंद्र बनत आहे की काय? असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती गेल्या पंधरा दिवसांत दिसत आहे. पुणे शहरात गेल्या १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोन दहशतवाद्यांना अटक केली. या दोघांचा संबंध जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणाशी होता अशी माहिती समोर आली होती.

आता या प्रकरणातील तिसरा आरोपी शहानवाज फरार झाला होता. आता एनआयएने एका डॉक्टरास अटक केली आहे. हा डॉक्टर इसिससाठी तरुणांची भरतीकरण्याचे काम करत होता अशी माहिती NIA च्या तपासामध्ये समोर आली आहे. पुणे शहरातील कोंढवा भागांत एनआयएने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही मोठी कारवाई केली आहे. यापूर्वी अटक केलेले दोन्ही दहशतवादी कोंढवा परिसरात राहत होते. आता पुन्हा कोंढवा भागात इसिस या दहशतवादी संघटनेत तरुणाची भरती करणाऱ्या डॉक्टरास अटक केली आहे.

डॉ. अदनानली सरकार (४३) असे त्या डॉक्टराचे नाव आहे. त्याच्याकडून गॅजेट्स आणि ‘इसिस’शी संबंधित काही दस्तावेज जप्त केले आहेत. एनआयएने ३ जुलै रोजी मुंबईतून चार जणांना अटक केली होती. त्यात तबिश नासेर सिद्दिकी, अबू नुसैबा आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांचा समावेश होता. त्यांच्या चौकशीतून पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख याला अटक केली होती. यानंतर डॉ. सरकार याचे नाव समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.