Latest Marathi News

BREAKING NEWS

राष्ट्रवादी अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आशावादी; प्रफुल्ल पटेलांच सूचक विधान

0

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेंच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी प्रचंड आशावादी असल्याचं दिसून आलं आहे. आता प्रफुल्ल पटेल यांनीच, दादा आज नाही. पण भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात असं विधान केलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू होती.

अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सोशल मीडियावर तसं पोस्टही केलं होतं. त्यामुळे या चर्चांना महत्त्व आलं होतं. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी या लोकांना खडसावल्याचं बोललं जात आहे. अशात आता पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘अजित पवार हे लोकप्रिय आणि प्रभावी नेते आहेत. अनेक वर्षांपासून ते आमच्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. जे काम करतात, त्यांना आज, उद्या किंवा परवा नक्कीच संधी मिळते. अनेकांना संधी मिळाली आहे. अजितदादांनाही मिळेल, आज नाही तर उद्या किंवा भविष्यात. त्या दिशेने आम्ही काम करू. 10 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल, असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच केला होता.

राष्ट्रवादी अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आशावादी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार अशी ग्वाही दिल्यानंतरही राष्ट्रवादी प्रचंड आशावादी असल्याचं दिसतंय. अजित पवार एक ना एक दिवस मुख्यमंत्री बनतीलच असा दावा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. प्रफुल्ल पटेलांच्या या दाव्यावर शिवसेना थोडीशी सावध भूमिका घेताना दिसतेय. शिवसेनेनं अतिशय सावध प्रतिक्रिया देऊन वाद होऊ नये याची काळजी घेतली आहे. उपमुख्यमंत्री बनण्यासाठी अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यानं या चर्चेला बळ मिळालंय.

Leave A Reply

Your email address will not be published.