Latest Marathi News

BREAKING NEWS

आई, भक्तांना आरोग्यदायी आशीर्वाद दे!.. चंद्रकांतदादांची अंबाबाईच्या चरणी प्रार्थना

0

कोल्हापूर दि.३ |

तब्बल दोन वर्ष कोरोना काळामुळे करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन भक्तांना घेता आलं नाही. यंदा मात्र कोरोना निर्बंधाशिवाय नवरात्र उत्सव साजरा होत आहे, याच पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. सर्वांच्या सुखी समृद्ध व आरोग्यदायी जीवनाचे आई अंबाबाई कडे त्यांनी साकडे घातले.

कोरोना काळ हा सर्वांसाठी कठीण होता. कोरोनामुळे अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावावे लागले आहे. पुन्हा कोरोनासारखी संकटे येवू नयेत तसेच सगळ्यांना सुखी समृद्ध व आरोग्यदायी आयुष्य लाभावे यासाठी आशीर्वाद दे, असं साकडं चंद्रकांतदादांनी आई अंबाबाईच्या चरणी घातले आहे, व येणाऱ्या दसऱ्याच्या सर्वांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.