Latest Marathi News

BREAKING NEWS

बेन्टेक्स खासदार, आमदारांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही

0

 

‘गेले ते बेन्टेक्स, उरलं ते सोनं’ असे म्हणणारे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक स्वतःच बेंटेक्स निघाले. कठीण काळात शिवसैनिकांनी आमदार प्रकाश आबिटकर व संजय मंडलिक यांच्यावर विश्वास टाकला, पण त्यांनी मतदार जनतेला व पक्षाला धोका देऊन शिंदे गटाचा मार्ग धरला. अशा बेन्टेक्स खासदार व आमदारांना शिवसेना कधीही माफ करणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केले.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील निधी मंजूर होऊन पूर्ण झालेल्या झापाचीवाडी (राधानगरी) प्रकल्पाचे पाणीपूजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी मोठया संख्यने शिवसैनिक सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

प्रकाश पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अस्तित्वासाठी शिवसेनेने जिल्हा बँकेची निवडणूक लढली. आबिटकरांना मोठय़ा प्रमाणात निधी देऊनही आबिटकर यांनी पक्षाशी प्रतारणा केली. खासदार मंडलिक यांच्यावर जिह्यातील शिवसैनिकांनी विश्वास टाकला. जिह्याचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले.

 

मात्र, त्यांनीही अचानक भूमिका बदलत शिवसेनेला धोका दिला. मात्र, 2024ला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या दोघांनाही शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवत त्यांना पराभूत करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.