Latest Marathi News

BREAKING NEWS

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; एक लढाई जिंकलो, यापुढेही जिंकू – एकनाथ शिंदे

0

 

दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दसरा मेळाव्याला कुणाकडे किती कार्यकर्ते जमणार? यावरून दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यंदा मेळाव्यात दोन्ही गटांचा आमना सामना बघायला मिळणार आहे. दरम्यान, या दसरा मेळाव्यातील रॅलीसाठी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “आपलीच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच आमच्याकडे जास्त संख्या असून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे लोक आहोत.” असेही ते म्हणाले

तसेच रॅलीची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. हजारो, लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येतील. त्यांना कोणतीही समस्या येऊ नये, ते सहजरित्या यावेत. यासाठी काम केले जात असून ही रॅली यशस्वी ठरणार आहे.” असेही ते म्हणाले. “मैदान कोणतेही असो विचार महत्त्वाचे आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत असल्यामुळे आम्हाला लोकांचे समर्थन मिळत आहे. आमच्यासोबत जनता जोडली जात आहेत. आम्ही जनतेचे काम करत असल्यामुळे जनता नक्की येणार.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी खरी शिवसेना कोणाची यावर स्पष्टीकरण दिले. “लोकशाहीमध्ये संविधानानुसार गोष्टी होत असतात. बहुमताला महत्व असून आमच्याकडे ५५ पैकी ४० आमदार आहेत. १० अपक्ष आमदार आहे. अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी ५५ पैकी ४० आमदार आमच्यासोबत आहेत. १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे आहेत. देशातील ४० राज्यांचे प्रमुख आमच्यासोबत आहेत.जनताही आमच्यासोबत आहेत.” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.