Latest Marathi News

BREAKING NEWS

‘मोदीजींनी चांद्रयानासोबत राऊतांना तेवढं पाठवल असतं तर सगळी किरकिर मिटली असती’

0

मुंबई । भाराताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग केली आहे. सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा इसरो च्या शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले आहे.

भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचे कौतुक करताना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी इसरोच्या शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले असून आपल्या खास स्टाईलमध्ये संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र शहाजी बापू पाटील यांच्या विधानाची सुद्धा चांगलीच चर्चा होत आहे.

शहाजी बापू पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करताना मिश्किल टोलेबाजी केली आहे. या मिश्लिक टोलेबाजीतून शहाजी बापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांची एक चूक झाली चंद्रयान मध्ये संजय राऊत यांना तेवढं पाठवला असतं तर सगळी किरकिर मिटली असती असे टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.

कोल्हापुरात आज शरद पवारांची जाहीर सभा; नेमकं निशाण्यावर कोण ?

बीड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली लोकप्रतिनिधींशी चर्चा,कृषीमंत्री धनंजय मुंडे,…

Leave A Reply

Your email address will not be published.