Latest Marathi News

BREAKING NEWS

‘माझ्या जीवाला धोका’ आमदार प्रसाद लाड यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

0

मुंबई । भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा क्रिस्टल ग्रुप कंपनीचे सर्वेसर्वा प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून जिवाला धोका असल्याचे म्हणले आहे. अनोळखी व्यक्ती इमारती येथील कार्यालयाच्या बाहेर पाळत ठेवत असल्याचा दावा त्यांनी या पत्रामधून केला आहे. या धक्कादायक प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजपचे नेते आमदार आणि उद्योजक प्रसाद लाड यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांनाही हे पत्र त्यांनी पाठवले असून अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा पत्रामधून करण्यात आला आहे.तसेच व्यवयसायीक कारणास्तव ही पाळक ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हंटले आहे.

पत्रामध्ये गायकवाड नामक व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला असून जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे या पत्रामध्ये म्हणले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दखल घेण्यात यावी.. अशी विनंती या पत्रामधून करण्यात आली आहे. या पत्रावर आता गृहखाते काय भूमिका घेतायत हे पाहावे लागणार आहे.

‘मोदीजींनी चांद्रयानासोबत राऊतांना तेवढं पाठवल असतं तर सगळी किरकिर मिटली असती’

कोल्हापुरात आज शरद पवारांची जाहीर सभा; नेमकं निशाण्यावर कोण ?

Leave A Reply

Your email address will not be published.