Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापुरात आज शरद पवारांची जाहीर सभा; नेमकं निशाण्यावर कोण ?

0

कोल्हापूर । अजित पवार पवारांची साथ सोडून थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आपल्या सहकाऱ्यांबरोबर सामील झाले. या बंडखोरीनंतर शरद पवारांनी बंडखोरांच्या मानतदार संघात जाहीर सभेचा धडाकाच लावला होता अशातच आज एकेकाळी शरद पवारांचे निष्ठावंत समजले जाणारे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरात आज दसरा चौक येथे पवारांची सभा पार पडणार आहे. आज दुपारी चार वाजता होणाऱ्या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत.

दरम्यान, सभेची तयारी पूर्ण झाली या तयारीसाठी दोनच दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार कोल्हापुरात दाखल झाले आहे. या जाहीर सभेसाठी दसरा चौकात मोठा मंडप उभारण्यात आला असून या मैदानात अनेक मोठ्या नेत्याच्या सभा पार पडल्या आहेत. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार सभेत कोणावर निशाणा साधणार, याची राजकीय वर्तुळात उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपला सूचक इशारा दिल्याने, पवारांचे मार्मिक टोले कोणावर आघात करणार, याची चर्चा आतापासूनच रंगली आहे.

मात्र श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्‍थानी राहणार असल्याने राजकीय तर्कवितर्कही यानिमित्त लढवले जात आहेत. राष्‍ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची कोल्‍हापुरात जाहीर निर्धार सभा होत आहे. पश्‍चिम महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रवादीचा बोलकिल्‍ला अशी या जिल्‍ह्याची ओळख आहे. अजित पवार यांच्या फुटीनंतर जिल्‍ह्यात राष्‍ट्रवादी दोन गटांत विभागली आहे. हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही अजित पवार गटात गेल्याने या सभेत शरद पवार यांच्यासोबत सामान्य कार्यकर्त्यांचे पाठबळ कितपत असेल, हे देखील स्‍पष्‍ट होणार आहे. श्री. पवार यांची मार्मिक टोलेबाजीतून समाचार घेणारे राजकीय व्यक्तिमत्त्व अशी ख्याती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.