Latest Marathi News

BREAKING NEWS

खरी राष्ट्रवादी कोणाची ? थेट काँग्रेस नेत्याने उपस्थित केला सवाल

0

राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंद करून शब्द पवार यांची साथ सोडून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांना शरद पवार गटाकडून टीका केली जात आहे. केलेल्या टीकेला अजित पवार गटाकडून उत्तरही दिले जात आहे. सोबतच कधी काका-पुतण्याची भेट होते तर मग कधी वाय.बी.चव्हाण सेंटर गाठले जाते. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते संभ्रमात आहे.

या सगळ्या राजकीय घडामोडी अनेकांना पेचात टाकणाऱ्या आहेत. अशा संभ्रमात काँग्रेसचे विश्वजीत कदम हेसुद्धा ही पडले असून, राष्ट्रवादीतील घडामोडींवर त्यांनी भाष्य केले आहे. त्यांचे वक्तव्य अनेकांच्या भावना सांगून गेल्या आहेत. आटपाडी तालुक्यात काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा पार पडली. नेलकरंजी ते खरसुंडी अशी पदयात्रा काढण्यात आली. खरसुंडी येथे पदयात्रेनंतर आयोजित सभेत आमदार डॉ. कदम बोलत होते.

२ जुलै रोजी राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर पाच जुलै रोजी दोन्ही गटाच्या वेगवेगळ्या सभाही पार पडल्या. या सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

तेव्हा आता राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले असून, अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना रंगणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र घडतेय ते भलतं. त्यामुळे विश्वजित कदम यांना या घडामोडींनंतर कोणत्या गटाला ए टीम म्हणायचे आणि कोणत्या गटाला बी टीम म्हणायचे असा प्रश्न पडला आहे.

MMRDA च्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; थेट मनसे वाहतूक सेनेने दिला आंदोलनाचा इशारा !

संभाजी भिडे गुरुजींसह शिंदे सरकारच शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला

Leave A Reply

Your email address will not be published.