Latest Marathi News

BREAKING NEWS

ज्येष्ठ साहित्यिक पं.ना. कुलकर्णी यांचे निधन ; अतुल दीक्षित यांनी जागवल्या आठवणी

0

वैराग |

काका गेले असा निरोप बालमित्र अतुल केसकर यांनी भ्रमणध्वनी वरुन दिला. आज दुपारी दवाखान्यात त्यांचे निधन झाले.वैरागचे पं .ना .कुलकर्णी सर( हात्तिजकर ) वयाच्या ९०व्या वर्षी आजारात गेले .या निरोपाने काकाच्या आठवणी जाग्या झाल्या…

कुशल शिक्षक , लेखक , विचारवंत , सामाजिक घडामोडीने अस्वस्थ होणारा पत्रकार लेखक ,सोलापूरच्या विविध वर्तमानपत्रामध्ये त्यांचे विविध विषयावरील लेख वाचत आमची पिढी घडली.

कामगार कल्याण केद्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध नाटकात त्यांनी भूमिका केल्या पण त्यांचे मन रमले ते शिक्षण क्षेत्रातच , ग्रामीण भागात आयुष्य भर शिक्षक म्हणून त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या ते करत असताना ग्रामीण राजकारणांची नस त्यांना चांगली माहिती असे पण आपण समाज घडवला पाहिजे हे सुत्र त्यांनी कधीही विस्कटू दिले नाही.

सुमारे पन्नास वर्षापूर्वी आमच्या बार्शीतील लोखंड गल्लीतील घरात त्यांना पहिल्यांदा पाहिले .त्यांचे मोठे बंधू कै .गोविंदराव कुलकर्णी यांच्या शेजारी आम्ही राहायचो .पण काकांची भेट नेहमी व्हायची ती आमच्या एस.टी .स्टणँडवरील बुकस्टाँलवर .माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्या गप्पा मधून मोठ्या प्रमाणात लोकशिक्षण व्हायचे.

त्यांचे ज्येष्ठ पुत्र मुकूंद राज यांच्या घरी सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचा उत्सव होत असतो. त्यांची व्यवस्थित बातमी देणे हा आमच्या कडे कुळाचार होता. त्याप्रमाणे बातमी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये या कार्यक्रमासाठी वैरागचे पं.ना.कुलकर्णी उपस्थित होते .असा उल्लेख केला होता.त्यावरून एखाद्या घरगुती कार्यक्रमामध्ये त्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित आहे .ही आताच्या काळात बातमी असते. यावर ची काकांच्या बरोबर ची चर्चा अजूनही कानात घुमत असते.

असे अनेक प्रसंग डोळ्यातून वाहत आहे .भावपूर्ण श्रद्धांजली….
अतुल दीक्षित

Leave A Reply

Your email address will not be published.